हातमाग पदविका प्रवेशासाठी 9 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची मुदत

सोलापूर, दि.५(क.वृ.): केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील 2020-21 या शैक्षणिक सत्रासाठी तीन वर्षीय हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी बरगढ (ओडिसा) येथे एका जागेसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. 9 ऑक्टोबर 2020 पर्यंत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन नागपूरच्या वस्त्रोद्योग आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी केले आहे.
प्रथम सत्रासाठी आर्थिक दुर्बल घटकातून पात्र उमेदवाराची निवड करण्यासाठी वस्त्रोद्योगचे प्रादेशिक उपायुक्त सोलापूर, नागपूर, मुंबई, औरंगाबाद यांच्यामार्फत प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रवेश अर्जाचा नमुना आणि इतर माहिती प्रादेशिक उपआयुक्त कार्यालय किंवा वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या वेबसाईटवर www.dirtexamah.gov.in उपलब्ध आहे.
0 Comments