Hot Posts

6/recent/ticker-posts

मंडप, केटरिंग व लाईट डेकोरेशन व्यावसायिकांना शासनाने मदत द्यावी

 मंडप, केटरिंग व लाईट डेकोरेशन व्यावसायिकांना शासनाने मदत द्यावी 


चेतनसिंह केदार-सावंत यांची मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी
सांगोला दि.५(क.वृ.): कोरोनामुळे व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असून सामाजिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे. मंडप, केटरिंग, मंगल कार्यालय, डीजे, साऊंड सिस्टिम, लाईट डेकोरेशन आदी सेवा देणारे लाखो लोक आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे सर्व प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये क्षमतेच्या अर्ध्या आसन क्षमतेची परवानगी देण्यात यावी. या व्यवसायांवर अवलंबून असणाऱ्या कुटूंबाना राज्य सरकारने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाच्या आदेशानुसार  50 लोकांच्या उपस्थितीत मंगल कार्यालय, फार्महाउस या ठिकाणी लग्न समारंभ करण्याची परवानगी आहे. मात्र कमी संख्या असल्याने कार्यक्रम करण्यासाठी आयोजक सहमत नाहीत तसेच त्यांचा खर्चही निघत नाही. त्यामुळे मंडप, केटरिंग, लाईट डेकोरेशनशी संबंधित व्यवसाय व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लाखो कुटूंबाना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.  संबंधित व्यवसाय धारकांना सर्व प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये मंडप कार्यालय, हॉल, लॉन क्षमतेच्या अर्ध्या आसन क्षमतेची परवानगी देण्यात यावी. मंगल कार्यालय, हॉल, लॉन्ससाठी विद्युत विभागाकडून फिक्स डिमांड चार्ज माफ करावा. कर्ज धारकांचे व्याज माफ करावे, मंडप व्यवसाय धारकास उद्योगाचा दर्जा द्यावा, यामुळे व्यवसाय चालवण्यासाठी बँकेकडून कर्ज सहज प्राप्त मिळेल, या व्यवसायाशी संबंधित सर्व व्यवसाय धारकांनी घेतलेल्या कर्जावर सबसिडीची तरतूद करावी, सूक्ष्म व अतिसूक्ष्म व्यावसायिकांना मदत मिळावी अशा विविध मागण्यांचे निवेदन भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार योगेश खरमाटे यांच्यामार्फत दिले आहे.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, नगरसेवक आनंदा माने, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गजानन भाकरे, शहराध्यक्ष आनंद फाटे, तेजस बोत्रे, आनंद साळुंखे, नवनाथ इंगोले, राजू शिंदे, नूर महंमद मुल्ला, आनंद सपाटे, प्रवीण जानकर, यांच्यासह सांगोला तालुका डेकोरेटर व कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

1 Comments

  1. Nice, woes of poors are put better way.Serve poors and needy this way will give you strength...Shivaji Sathe.

    ReplyDelete