Hot Posts

6/recent/ticker-posts

आमदार शहाजीबापू पाटील यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक....

 आमदार शहाजीबापू पाटील यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक....


 विचार-विनिमय करून घेणार जनता कर्फ्यूचा निर्णय
सांगोला दि.५(क.वृ.): सांगोला शहर व तालुक्यामधे सध्या कोरोनाचा  प्रादुर्भाव  वेगाने वाढत आहे शासनाने बरेचसे निर्बंध हटवल्यामुळे सर्वत्र गर्दी झाली असून परिणामत: सांगोला शहरात व तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढ अत्यंत झपाट्याने होऊ लागली आहे त्यामुळे  बहुतांश नागरिकांकडून जनता कर्फ्यु लावण्याची मागणी आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे केली जात आहे. वाढत असलेल्या कोरोना  रुग्णांची संख्या आटोक्यात आणन्याकरिता व कोरोना विषाणूची साखळी तोडणे करिता सध्या जनता कर्फ्यू शिवाय पर्याय नसल्याने याबाबत विचारविनिमय करण्याकरिता आज रविवार दिनांक ६ सप्टेंबर  रोजी अहिल्यादेवी होळकर सभागृहामधे दुपारी १२ वाजता आमदार शहाजीबापू पाटील यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे.
 या बैठकीसाठी माजी आमदार गणपतराव देशमुख, मा. दिपक आबा साळुंखे पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख,प्रा.झपके सर,बाबुराव गायकवाड,नगराध्यक्षा सौ राणीताई माने,सभापती राणीताई कोळवले,  भाऊसाहेब रूपनर,प्रफुल्ल कदम संभाजी आलदर यांच्यासह सर्व नगरसेवक,पं.स. सदस्य, जि.प.सदसय,सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी,व्यापारी संघटनाचे प्रतिनिधी,पत्रकार बांधव,प्रतिष्ठित नागरीक यांना आमंत्रित केले आहे.
सर्व नेतेमंडळी व व्यापारी प्रतिनिधी यांच्याशी विचारविनिमय करून तालुक्यामधे जनता  कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात येईल.सदर बैठकीमध्ये सोशल  डिस्टंसिंगचा काटेकोर पालन करणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापु पाटील यांनी दिली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments