सांगोला तहसीलदारांच्या चेंबर मध्येच उडाला सोशल डिस्टन्सचा फज्जा ..तहसीलदारांची मात्र बघ्याची भूमिका

प्रशासनच करीत आहे, नियमांची पायमल्ली
सोलापूर दि.५(क.वृ.) : सध्या सांगोला शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढत आहे.खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाचा विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत, त्यातच सार्वजनिक ठिकाणी व शासकीय कार्यालयात प्रामुख्याने सोशल डिस्टन्स ठेवणे, मास्क वापरणे, हे प्रशासनाने बंधनकारक केले आहे. तशा प्रकारचे आदेश वरिष्ठ कार्यालय,जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनी तशा सूचना तहसिल कार्यालयास दिल्या आहेत. तरीसुद्धा काल दिनांक ४ सप्टेंबर रोजी भाजपा च्या वतीने जे निवेदन देण्यात आले. त्यावेळी सर्व शासकीय नियमांची पायमल्ली करण्यात आली.उपस्थित अनेक लोकांनी मास्क न लावल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता राजकीय पक्षांची निवेदने स्वीकारताना ठराविक व प्रमुख व्यक्ती मार्फत निवेदन स्वीकारणे अपेक्षित असताना इथे मात्र तसे घडले नाही.यावेळी मात्र तहसिल प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतल्याने तालुक्यात या घटनेबद्दल उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
अशा घटनेमुळे कोरोनाला आळा बसण्याऐवजी त्यामध्ये वाढ होण्याची शयकता नाकारता येत नाही. सामान्य नागरिकांना एक कायदा व प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेगळा कायदा आहे,की काय? असा संतप्त सवाल सुजाण नागरिकांतुन विचारला जात आहे. सामान्य नागरिकांच्या मनामध्ये प्रशासनाविषयी प्रतिमा मलिन होण्याआधी प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी सामान्य जनतेची अपेक्षा आहे.
0 Comments