घरात अठराविश्व दारिद्रय असणाऱ्या कन्येने मिळवले दहावीत 96%मार्क - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 7, 2020

घरात अठराविश्व दारिद्रय असणाऱ्या कन्येने मिळवले दहावीत 96%मार्क

घरात अठराविश्व दारिद्रय असणाऱ्या कन्येने मिळवले दहावीत 96%मार्क 

तुळजापूर दि.७(क.वृ.): तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथील कु.मंदीरा संजय सुरवसे या विद्यार्थीनीने  घरची अत्यंत हालाखीच्या परिस्थिती असताना ही आईचे श्रम व अथक  कष्टाचा जोरावर  दहावीच्या परीक्षेत 96.40 टक्के गुण मिळवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कु. मंदीरा हिचे वडील श्री. संजय सुरवसे हे दिव्यांग आहेत तर आई गृहीणी आहे. मंदीराची आई शिवणकाम  करुन  आपल्या मुलीला  शिकवले असुन मंदीरानेही आई वडीलांच्या कष्टाची  चीज केली आहे.

शेती नाही नवरा दिव्यांग अशा बिकट परिस्थितीतही मंदीराच्या आईने  आपल्या मुलीला शिकवण्याचा निर्धार  केला. घरी 'अठराविश्व दारिद्र्य' असतानाही कु. मंदीरा हिने शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. तिचे अचाट प्रयत्न व प्रबळ इच्छाशक्ती ने हे यश संपादन केले .
पुढील शिक्षणासाठी तिला अर्थिक मदतीची गरज असुन त्यासाठी दाते पुढे आले तरच ती पुढील शिक्षण घेवु शकणार आहे
भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी बनायाचे
आपल्या या  यशाविषयी बोलताना मंदीरा सांगते की घरची गरीबी वडील अपंग अशा कठीण  परिस्थितीत आईने मला कष्ट करुन शिकवले  'माझ्या या यशात आई-वडीलांचा व शाळेतील शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे.' त्याचबरोबर मुलींनी न खचता, न घाबरता शिक्षण घ्यावे व आत्मनिर्भर बनावे' असंही तिनै यावेळी सांगितले . उच्च शिक्षण घेऊन कु. मंदीरा ही भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होऊ इच्छिते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages