चिमुकल्या काव्याने राखीतुन दिला कोरोना संरक्षणाचा संदेश
पिंपळनेर दि.७(क.वृ.): रक्षाबंधनाच्या निमित्ताने कुर्डूवाडी मधिल आदर्श पब्लिक स्कूल मध्ये पहिलीत शिकणार्या तांबवे येथील ६ वर्षीय काव्या निलेश देशमुख या चिमुकलीने कोरोना विषाणु संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर स्वतः घरी मास्कचे डिझाईन असलेली राखी बनवून कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क किती महत्वाचे आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. आपला लहान भाऊ राघव साठी तिने अशी मास्कची राखी बनवत कोरोना संरक्षणाचा संदेश दिला. तिच्या या कौशल्याधिष्ठित आदर्श उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments