Hot Posts

6/recent/ticker-posts

हातमागावरील वस्त्रे वर्षातून पाच-सहा वेळा खरेदी करा - महापौर

 हातमागावरील वस्त्रे वर्षातून पाच-सहा वेळा खरेदी करा - महापौर 

पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय हातमाग दिन साजरा...
सोलापूर दि.७(क.वृ.) :७ ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने शहरातील विणकर बाग येथील विणकर पुतळ्याला महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते सुताचा हार आणि पुष्पहार घालून राष्ट्रीय विणकर दिन साजरा करण्यात आला आहे.यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या सबंध देशात हातमाग कामगारांच्या हाताला काम नसल्याने कामगारांच्या आत्महत्या वाढत आहे. भविष्यात हीच परिस्थिती राहिली तर येणा-या पिढीला हातमागाचे साहित्य संग्रहालयात बघावे लागेल. हातमाग कामगारांना कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी हातमागावरील तयार होणाऱ्या वस्त्रे वर्षातून किमान पाच ते सहा वेळा खरेदी करून परिधान करावे, असे आवाहन सोलापूरचे महापौर श्रीकांचना यन्नम केले आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक इंदापूरे म्हणाले, राष्ट्रीय हातमाग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी हातमागावरील किमान दोन उत्पादने खरेदी करून हातमाग व्यवसाय वृध्दीला हातभार लावण्याचा संकल्प करुया. यंत्रमागावरील उत्पादनाच्या तुलनेत हातमागावरील उत्पादन खर्च जास्त असल्याने हातमागावरील उत्पादने काहीशी महाग वाटतात. हातमाग कारागीरांचे कौशल्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतीय वातावरणासाठी पोषक अशा वस्त्रनिर्मितीला चालना देण्यासाठी  हातमागावरील उत्पादने खरेदी करून राष्ट्रीय हातमाग दिन सार्थक करावा.असे ते म्हणाले. यावेळी पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष राकेश पुंजाल, गौरीशंकर कोंडा, नितीन मार्गम, प्रशांत कुडक्याल, रमेश यन्नम, सुधाकर नराल, अमर येरपूल, किरण वल्लाल, चंद्रशेखर गडगी, आनंद गोसकी आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments