Hot Posts

6/recent/ticker-posts

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कारासाठी ; 10 सप्टेंबर 2020 पर्यंत अर्ज करण्याची मुदत

 माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कारासाठी ;
10 सप्टेंबर 2020 पर्यंत अर्ज करण्याची मुदत

 


सोलापूर, दि.१३(क.वृ.): जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. अर्ज करण्याची मुदत 10 सप्टेंबर 2020 पर्यंत असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.  

सोलापूर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांना कळविण्यात येते की, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य  क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट क्षेत्रातील कामगिरी करणारे, पूर/जळीत/दरोडा/अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे तसेच देश/ राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक, विधवा पाल्य, माजी सैनिकांचे पाल्य 10 वी12 वीपदविका आणि पदवी अभ्यासक्रमात सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या तसेच पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापिठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या व IIT, IIM, AIIMS अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या पाल्यांनी विशेष पुरस्कारासाठी अर्ज करावेत. विशेष गौरव पुरस्कारासाठी आवश्यक असणारा विहित नमुन्याचा अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे उपलब्ध आहे.

 

विशेष गौरव पुरस्कारासाठी लागणारी कागदपत्रे

 वैयक्तिक अर्ज

2 जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध (डी.डी 40) विहित नमूना अर्ज

3 पाल्य शिकत असल्याबाबतचा बोनाफाईड दाखला

4 मार्कशिटची सांक्षाकित प्रत

5 माजी सैनिक, विधवेच्या ओळखपत्राची छायांकित प्रत

6 डिस्चार्ज बुकमधील फॅमिली डिटेलच्या पानाची झेरॉक्स प्रत

7 बँक पासबुकची पहिल्या पानाची छायांकित प्रत

8 आधार कार्ड छायांकित प्रत

9 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले असेल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र

अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर 0217-2731035 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments