कार्यालयीन वेळेतच सामाजिक संस्थांनी निवेदने द्यावीत
जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आवाहन
सोलापूर, दि.१३(क.वृ.): राज्य शासनाने सर्व शासकीय कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा केला असल्याने शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी कार्यालये बंद असतात. यामुळे नागरिक, सामाजिक संस्था, संघटना यांनी आपल्या मागण्यांची निवेदने कार्यालयीन वेळेतच अधिकाऱ्यांना द्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
सुट्टीच्या दिवशी सामाजिक संघटना, संस्था विविध मागण्यांसाठी शासनाला निवेदने, पत्र, अर्ज देण्यासाठी शासकीय कार्यालयात गर्दी करतात. अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसतानाही अर्ज सादर करण्याचा आग्रह करतात. मात्र कार्यालयाला सुट्टी असल्याने संबंधितांच्या मागण्यांच्या अर्जावर कारवाई करता येत नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शहर व ग्रामीण पोलीस प्रशासनाने नागरिकांना सुट्टीच्या दिवशी कार्यालयात गर्दी करण्यास मज्जाव करावा, अर्ज आल्यास जिल्हा नियंत्रण कक्षात जमा करावेत, असेही श्री. शंभरकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
0 Comments