Hot Posts

6/recent/ticker-posts

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण

 पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण


सोलापूर दि.१३(क.वृ.): भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ शनिवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री  दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार आहे.

या समारंभास सर्व लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी किंवा त्यांचे आई-वडील, कोरोना योद्धा डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी यांच्यासह या आजारावर मात केलेले नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

या दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 या दरम्यान इतर कोणत्याही शासकीय अगर निमशासकीय कार्यालयांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करु नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.35 वाजेच्या पूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावा. दि. 15 ऑगस्ट 2020 रोजी सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतींवर, ऐतिहासिक महत्वाच्या किल्ल्यांवर राष्ट्रध्वज उभारण्यात यावा.

सामुदायिक देशभक्तीपर गीतगायन, वाद विवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा/देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धा, लॉकडाऊनमुळे एखाद्या विषयाचा वेबीनार अशा कार्यक्रमांचे आयोजन शाळा व महाविद्यालयांमार्फत ऑनलाईन पद्धतीने करावे.

वर्धापन दिनानिमित्त प्लास्टिकचे झेंडे न वापरण्याबाबत तसेच कोरोना विषाणूमुळे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये सामाजिक अंतर ठेऊन व याबाबतच्या सर्व नियमांचे पालन करावे. तसेच प्रत्येकाने मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments