धनगर समाजाचे रक्त लिखीत आंदोलन
तुळजापूर दि.१३(क.वृ.):- धनगर समाज एस टी आरक्षणाची त्वरीत अमंलबजावणी करा या प्रमुख मागणी सह अन्य मागण्याचे निवेदन स्वताचा रक्ताने तहसिल मध्ये लिहुन रक्तलिखित निवेदन धनगर ऐक्य अभियान अंतर्गत धनगर तालुका समाज संघटनेच्या वतीने तहसिलदार यांना गुरुवार दि.12 रोजी देण्यात आले.
यावेळी धनगर समाज एस टी आरक्षण त्वरीत करा मेंढपाळांना सरंक्षण द्या धनगर समाजासाठी ऐक हजार कोटीची तरतूद करा या मागण्यांची दखल शाषणाने न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इषारा या निवेदनात दिला असुन हे निवेदन राजेंद्र शेडगे, प्रमोद दाणी, सोनु पैलवान यांनी दिले.
0 Comments