घरच्यापेक्षाही चांगलं जेवण मिळतयं… बार्शीतील रूग्णांची कोविड केअर सेंटरमधील सुविधांबाबत पालकमंत्री भरणे यांना पोचपावती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 27, 2020

घरच्यापेक्षाही चांगलं जेवण मिळतयं… बार्शीतील रूग्णांची कोविड केअर सेंटरमधील सुविधांबाबत पालकमंत्री भरणे यांना पोचपावती

घरच्यापेक्षाही चांगलं जेवण मिळतयं…बार्शीतील रूग्णांची कोविड केअर सेंटरमधील सुविधांबाबत पालकमंत्री भरणे यांना पोचपावती




सोलापूर, दि.२७(क.वृ.): जेवण चांगलं मिळतंय का....वेळेवर साफ-सफाई होते का....उपचार व्यवस्थित मिळतात का....हो घरच्यापेक्षा जेवण चांगलं आहे....इथं चांगली काळजी घेतली जात आहे.....हा संवाद आहे बार्शीतील छत्रपती शिवाजी महाविद्यालय पॉलिटेक्निक कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमधील पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि कोरोना रुग्णांमधील.
यावेळी आमदार यशवंत मानेजिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरप्रांताधिकारी हेमंत निकमअतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडेप्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अंकिततहसीलदार डी.एस. कुंभारजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेलेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादारनगरपरिषदेचे मुख्याधिकारी शिवाजी गवळीतालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जोगदंड आदी उपस्थित होते.
श्री. भरणे यांनी   रविवारी सायंकाळी बार्शीतील कोविड केअर सेंटरला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली, रुग्णांकडून माहिती घेतली.   आपल्याला कोरोनाला हरवायचं आहे. शासन आपल्यासाठी सर्वतोपरी मदत करीत आहे. तुम्ही बरे होताय, काळजी करू नका. मनोधैर्य वाढवाखचू नकाअसेच हसत खेळत रहा, घाबरू नका, अशा शब्दात श्री. भरणे यांनी रूग्णांना धीर दिला.
बार्शीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह, छत्रपती शिवाजी महाविद्यालय वसतिगृह, छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे पॉलिटेक्निक कॉलेज याठिकाणी
चार तर वैरागमध्ये श्रीसाई आयुर्वेदिक महाविद्यालयात कोविड केअर सेंटर आहेत. याठिकाणी असणाऱ्या त्रुटींची त्वरित पूर्तता करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
सूरपाट्यांनी भारावले पालकमंत्री
पालकमंत्री श्री. भरणे आले त्यावेळी एकीकडे देशभक्तीपर गीते तर एकीकडे रुग्णांमध्ये सुरपाट्याचा खेळ रंगात आला होता. हे पाहून पालकमंत्री भारावून गेले. त्यांनी काही अंतरावरून रुग्णांशी संवाद साधला. आपणही सूरपाट्या खेळल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
 वृक्षारोपण करण्याची रूग्णांची इच्छा
आम्ही रूग्ण म्हणून याठिकाणी असलो तरी या महाविद्यालयातील कोविड सेंटरची आठवण म्हणून आम्हाला येथे वृक्षारोपण करायचे आहेखड्डे खांदून तयार आहेतअसे एका रूग्णाने पालकमंत्र्यांकडे विनंती केली. श्री. भरणे म्हणालेहा चांगला उपक्रम आहे. रोपांची व्यवस्था त्वरित रोपे करण्यात येईल.
नागपंचमींला महिला रूग्णांचा फेर
या कोविड केअर सेंटरमध्ये मुलेमध्यमवयस्कमहिला हे आपल्या आवडीचे खेळ खेळत आहेत. नागपंचमीला महिलांनी सेंटरमधील मैदानातच फेर धरल्याचे रूग्णांनी आवर्जुन सांगितले.
लॉकडाऊन तुमच्या आरोग्यासाठीच- श्री. भरणे
शासन आणि प्रशासनाला लॉकडाऊन करण्यात आनंद नाही. तालुक्यातील रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आपल्याला रूग्ण कमी करायचे आहेत. प्रत्येकाच्या आरोग्यासाठी आणि जीविताचा धोका टाळण्यासाठी हा लॉकडाऊन आहे. प्रशासनाला सहकार्य कराघराबाहेर पडताना मास्कचा वापर करासुरक्षित अंतर ठेवाहात साबणाने धुवाअसे आवाहनही श्री. भरणे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages