व्यापारी बांधवाना हिशोबशास्त्राचे ज्ञान गरजेचे : डॉ. आनंद मुळे
अकौंटिंग व टॅली या विषयावर व्यापाऱ्यांसाठी वेबिनार संपन्न...
तुळजापूर दि.२७(क.वृ.):- उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघ व अष्टभुजा एज्युकेशनल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने अकौंटिंग व टॅली या विषयावर व्यापाऱ्यांसाठी जिल्ह्यातील अकौंटिंग या विषयातील तज्ञ डॉ. आनंद मुळे यांचा वेबिनार संपन्न झाला. व्यापारी बांधवाना अकौंटिंग या विषयाचे मूलभूत ज्ञान देण्याच्या उद्देशाने या वेबिनारचे आयोजन शनिवार दि.२५ ला करण्यात आले होते. व्यापारी वर्गाचा अत्यंत जिव्हाळ्याच्या अकौंटिंग या विषयातील महत्वाच्या संकल्पनांची ज्यामध्ये अकौंटिंग करण्याच्या शाखा,अकौंटिंग करण्याच्या पद्धती, व्यवसायात केल्या जाणाऱ्या खर्चाचे प्रकार व त्याचे वर्गीकरण करण्याच्या पद्धती, उत्पन्नाचे वर्गीकरण याची माहिती वेबिनार मध्ये देण्यात आली. पारंपरिक पद्धतीसोबत संगणकाद्वारे अकौंटिंग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टॅली या संगणकीय प्रणालीची माहिती देखील वेबिनार मध्ये देण्यात आली. शनिवारी जिल्हाभरात लोकडाऊन असल्याने जिल्हाभरातून वेबिनारला जवळपास १०० व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवला. सर्व सहभागी व्यापाऱ्यांना वेबिनार सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. वेबिनारचे प्रास्ताविक व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री यांनी तर आभार सचिव लक्ष्मीकांत जाधव यांनी मानले.
0 Comments