सिंहगड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सी .बी. एस. इ.बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश
सांगोला (प्रतिनिधी) बऱ्याच प्रतिक्षेनंतर सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून सिंहगड पब्लिक स्कूल कमलापुर च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून यशाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत ऋषिकेश माळी यांनी 87.6 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला , प्रसन्न कंटीकर या विद्यार्थ्याने 79.4 टक्के गुणासह द्वितीय तर काजल केदार या विद्यार्थिनीने 76.6 टक्केवारी मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे.या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कॅम्पस डायरेक्टर श्री अशोक नवले व शाळेच्या प्राचार्य समीरा फर्नांडिस यांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments