सांगोला ( पुजारवाडी ) प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून ,तर ४ कि.मी. पर्यंतचा परिसर बफर झोन म्हणून घोषीत
सांगोला (प्रतिनिधी) :- सांगोला शहर व परिसरात सद्यस्थितीत कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रार्दुभाव होण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना संसर्ग रोखण्याकरता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता सदर विषाणूची एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्ती/ इसम त्याच्या संपर्कात आलेले होते. सांगोला नगरपरिषद हद्दीमधील पुजारवाडी येथे एक व्यक्ती कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे.
त्यामुळे सांगोला नगरपरिषद हद्दीमधील सर्व सीमा बंद करण्यात आली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.तसेच भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ व जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडील दिशा निर्देशानुसार सांगोला नगरपरिषद हद्दीत मधील सर्व परिसराचे सीमा क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
तसेच सदर प्रतिबंधित क्षेत्रापासून ४ किमी पर्यंतचे परिसरातील गाव , वाड्या /वस्त्या त्यामध्ये १. चिंचोली २.एखतपुर आवताडे वस्ती ३. वाढेगाव ४. गोडसेवाडी ५. बामणी शिवेपर्यंत ६.कडलास ७. वासुद हे क्षेत्र बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे,सोशल डिस्टन्स ठेवावा,गर्दी करू नये,असे आवाहन ही यावेळी प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.
0 Comments