राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक तालुका अध्यक्षपदी उद्योगपती अनिलनाना खटकाळे यांची निवड
जिल्हा उपाध्यक्ष पदी सतीश काशीद,तर कार्याध्यक्षपदी नारायण गावडे यांची निवड.
सांगोला/ प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक तालुका अध्यक्षपदी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचे खंदे समर्थक, युवा सम्राट, उद्योगपती अनिलनाना खटकाळे यांची निवड करण्यात आली आहे.जिल्हा उपाध्यक्ष पदी सतीश काशीद यांची तर कार्याध्यक्ष पदी नारायण गावडे यांची निवड जाहीर करण्यात आली.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या आदेशाने व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत माने यांच्या हस्ते सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित निवडीचे पत्र देवुन, सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
राजकीय -सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना, आज पर्यंतच्या काळात मा. दिपकआबांच्या मार्गदर्शना खाली जाती-पातीच्या पलिकडे जावून सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. तसेच प्रामुख्याने युवकांना योग्य मार्गदर्शन करुन युवा पिढी सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यामुळे युवकांची मजबूत फळी निर्माण केली आहे. राजकीय आणी समाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उद्योगपती अनिलनाना खटकाळे यांची युवक तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
उद्योगपती अनिलनाना खटकाळे यांच्या युवक तालुका अध्यक्षपदाच्या निवडीमुळे युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
सांगोला शहरासह तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील सर्व स्तरातील नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील यांच्या विचाराने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी मोठ्या विश्वासाने युवक तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्या विश्वासास पात्र राहून सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे विचार तळागळा पर्यंत पोहचवून तालुक्यातील प्रत्येक गाव वाड्या-वस्त्यांवर युवक शाखा स्थापन करून पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार.--अनिल नाना खटकाळे(नूतन युवक तालुका अध्यक्ष)
0 Comments