अजयसिंह इंगवले-पाटील यांची युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी फेरनिवड
सातारा जिल्हा प्रभारीपदाची दिली जबाबदारी
सांगोला (तालुका प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते सांगोला येथील अजयसिंह इंगवले-पाटील यांची युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी फेरनिवड करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे सातारा जिल्हा प्रभारीपदाची मोठी जबाबदारी दिली आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांला प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी मिळाल्याने काँग्रेस व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
सांगोला तालुक्यातील युवक काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते अजयसिंह इंगवले-पाटील यांनी विद्यार्थीदशेपासूनच काँग्रेसमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी यापूर्वी युवक काँग्रेसचे शहराकाध्यक्ष मोठया ताकदीने काम केले आहे. त्यांनी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस पदावर देखील काम केले आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी त्यांची निवडणुकीतून प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली होती. त्यांनी या काळात युवक काँग्रेसची मजबूत फळी निर्माण केल्याने दुसऱ्यांदा त्यांना प्रदेश सचिवपदी काम करण्याची संधी प्रदेश युवक काँग्रेसने दिली आहे. राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम, गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांचे विश्वासू मानले जातात. तर अजयसिंह इंगवले-पाटील यांच्या निवडीमुळे काँग्रेस व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
0 Comments