Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूज येथील कदम हॉस्पिटलला कोविड सेंटर करण्यास महिला वर्गाचा तीव्र विरोध

अकलूज येथील कदम हॉस्पिटलला कोविड सेंटर करण्यास महिला वर्गाचा तीव्र विरोध


अकलूज(प्रतिनिधी) अकलूज येथील बॅकवर्ड सोसायटी आंबेडकर नगर या परिसरात कदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असून या हॉस्पिटलला कोरोना सेंटर करण्यात येथील महिला वर्गासह रहिवाशांनी तीव्र विरोध करीत उपविभागीय अधिकारी यांची समक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.



       बॅकवर्ड सोसायटी ही मागासवर्गीयांची वसाहत असून या वसाहतीचा परिसर दोन एकर सव्वीस गुंठ्याचा आहे. हा परिसर ग्रामपंचायतीकडे वर्ग नसल्यामुळे गेल्या सत्तर वर्षांपासून ही सोसायटी विकासापासून वंचित आहे. इथे रस्ते नाहीत, काही भागापुरतीच गटर तर अत्यंत दाटीवाटीच्या परिस्थितीत येथील रहिवाशांचे जगणे आहे.तर याच परिसरातच हॉस्पिटल असल्यामुळे येथील लहानापासून  वयोवृद्धांपर्यंतच्या नागरिकांची वर्दळ या हॉस्पिटलच्या परिसरात असते. येथील परिसर हा अत्यंत दाट लोकवस्तीचा असल्यामुळे येथील नागरिकांना संक्रमणाचा धोका होऊ शकतो? तर पुढील अनर्थ टळावा म्हणून येथील महिलावर्गांनी आपल्या व्यथा उपविभागीय अधिकारी शमा पवार यांचे समोर मांडत आमचा कोविड सेंटरला विरोध नसून ते सेंटर आमच्या परिसरातून इतर ठिकाणी हलवावे अशी मागणी केली आहे.


...आणि तहसीलदारांचा जिभेवरून ताबा सुटला..?
तहसीलदार अभिजित पाटील यांचे वाहन उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या गेटमधून आत येत असताना महिला वर्गाने त्यांच्याकडे आपल्या व्यथा मांडण्यासाठी धाव घेतली असता, महिला वर्गांचा गोंधळ पाहून तहसीलदार अभिजीत पाटील हे चांगलेच भडकले आणि महिला वर्गांना लांब सरा.. नाहीतर, मला तुमच्यामुळे कोरोना होईल.!असे म्हणून तहसीलदारांनी महिलावर्गांच्या भावना दुखावल्या...
Reactions

Post a Comment

0 Comments