Hot Posts

6/recent/ticker-posts

कोविड योध्यांनी जीवाची पर्वा न करता जनतेला धीर आणि आधार दिला- धैर्यशिल मोहिते-पाटील

कोविड योध्यांनी जीवाची पर्वा न करता जनतेला धीर आणि आधार दिला- धैर्यशिल मोहिते-पाटील 


अकलुज(क.वृ.): लॉकडाऊनच्या सुरवातीला कोरोना विषाणुमुळे सर्वसामान्य जनता भयभीत झाली होती.तेव्हा कोविड योध्यांनी स्वता:च्या जीवाची पर्वा न करता धाडसाने सर्वसामान्य जनतेला धीर आणि आधार देत मोलाचे काम केले.असे प्रतिपादन भाजप नेते धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी कोविड योध्यांना प्रोत्साहन देताना केले.
अकलुज येथील एकता बहुउद्देशिय संस्था यांचे वतीने  अरोग्य यंत्रणा,पोलिस प्रशासन,प्रशासकीय अधिकारी ,सफाई कर्मचारी, पत्रकार व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या माळशिरस तालुक्यातील कोविड योध्यांचा सन्मान अकलुज ग्रामपंचायतीच्या सभागृहात भाजप नेते धैर्यशिल मोहिते-पाटील यांचे हस्ते सन्मान पत्र देवुन करण्यात आला .त्यावेळी मोहिते-पाटील बोलत होते. 
पुढे बोलताना त्यांनी प्रत्येकाने दिलेल्या योगदानामुळेच समाजाला आधार मिळाल्याचे सांगुन अंगणवाडी सेविकांच्या कामाचे विषेश कौतुक केले.तसेच भविष्यातही कोरोना विषाणुवर
मात करण्यासाठी सर्व नागरीकांनी स्वयंशिस्त लावुन घ्यावी असे अवाहनही केले.सदर सन्मान सोहळ्या प्रसंगी एकता बहुउद्देशिय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जावेदबाबा तांबोळी,उपाध्यक्ष रशीद मुलाणी,सचिव अतिक जमादार,अकलुज शहर अध्यक्ष करण भंडारे,माळशिरस तालुका सचिव शौकत तांबोळी ,खजिनदार जब्बार तांबोळी, हाजी आदमभाई तांबोळी,ग्रामविकास अधिकारी मुंगुसकर  उपस्थित होते. 
Reactions

Post a Comment

0 Comments