सांगोला तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव : वाकी शिवणे येथील एक पॉझिटिव्ह तर जवळा येथील संशयित उपचारासाठी सोलापूरला दाखल
सांगोला (क.वृ.):- सांगोला तालुक्यातील मौजे वाकी शिवणे या गावातील एक महिला पंढरपूर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी जात होती. सदर उपचारादरम्यान संबंधित महिलेची कोरोना विषयक चाचणी दिनांक 2/7/2020 रोजी घेण्यात आली होती, सदर अहवालामध्ये संबंधित महिला कोरोना पाॅझिटिव्ह आढळली असून, संबंधित महिलेच्या जास्त संपर्कात असलेल्या वाकी शिवणे येथील अन्य ८ लोकांना आणि मेथवडे येथील एका महिलेस प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशिंगी येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा उदयसिंह भोसले यांनी दिली.
संबधित आठ लोकांना कोणताही त्रास होत नसून सर्वांची प्रकृती स्थिर असून उद्या त्यांचे नमुने घेण्यात येणार आहेत. तसेच जवळा येथील एका इसमाला श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने, त्यास पुढील उपचाराकरिता सोलापूर येथे पाठविण्यात आले आहे.तेथे त्याचे कोरोणा विषयक नमुने घेऊन पुढील उपचार केले जाणार आहेत. सर्व संबंधितांवर प्रशासन लक्ष ठेऊन असून नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे पालन करावे, मास्क आणि सॅनिटायझर चा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे,असे आव्हानही प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.
0 Comments