विराज जगताप च्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी--भीमराव शिंदे
करकंब (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील पिंपळे सौदागर येथील तरुण विराज जगताप याची अमानुषपणे हत्या करण्यात आली असून या गुन्ह्यातील आरोपीना अटक करण्यात आली आहे , परंतु ज्या मुलीने फोन करून विराज जगतापला बोलवून घेतले, त्या मुलीला सुद्धा सदर खून प्रकरणात सह आरोपी करून खटला जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी,अशी मागणी RPI चे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव शिंदे यांनी करकंब पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यातील अरविंद बनसोड यांच्या खुनातील सूत्रधारासह आरोपीचा खटला जलदगती न्यायालयात चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी, आणि नुकतेच मौजे कासेगाव ता- पंढरपूर येथील चर्मकार समाजाच्या लक्ष्मी गवळी या महिलेस आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे,सदर गवळी कुटुंबियांस पोलीस संरक्षण देवून सदर आरोपीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात करावी,अशी ही मागणी या निवेनाद्वारे RPI च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली आहे.सदर गुन्ह्यातील आरोपीवर कारवाई न झाल्यास पक्षाच्या आदेशाप्रमाणे तीव्र आंदोलन करण्यात येईल,आंदोलनावेळी होणाऱ्या परिणामाची जबाबदारी शासनाची व प्रशासनाची असेल,असा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे.
सदर निवेदन देताना आरपीआय आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव दादा शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंदे, दलित महासंघाचे सोमनाथ गायकवाड, भारतीय दलित महासंघाचे विजय नलवडे ,अतुल नाईकनवरे, व समाजबांधव उपस्थित होते.
0 Comments