Ads

Ads Area

चिंचोली तलाव भरून घेण्याचे नियोजन करा--खा.रणजितसिंह निंबाळकर

चिंचोली तलाव भरून घेण्याचे नियोजन करा--खा.रणजितसिंह निंबाळकर

नीरा उजवा कालव्याची उन्हाळी आवर्तनाची आढावा बैठक संपन्न

 
सांगोला ( प्रतिनिधी ) नीरा उजवा कालव्याच्या उन्हाळी आवर्तनाची आढावा बैठक आज  आमदार शहाजीबापू पाटील यांच्या  संपर्क कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीसाठी माढा लोकसभा मतदार संघाचे  खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या सह नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता एस आर. बोडके,  कन्स्ट्रक्शन विभागाचे कार्यकारी अभियंता गोडबोले, उपविभागीय अभियंता प्रगती यादव, यांच्या सह नीरा उजवा कालव्याचे सर्व अधिकारी उपस्थित होते. 
                      नीरा उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तन सध्या सुरु आहे, यातून उर्वरीत शेतकऱ्यांना व्यवस्थित नियोजन करून सर्वांना पाणी योग्य प्रकारे देण्याच्या सूचना खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, व माजी आमदार दीपकआबा साळुंखे यांनी दिल्या, व नीरा धरण्याच्या कॅचमेंट क्षेत्रात पाऊस समाधानकारक पडत असल्याने या पाण्यातून चिंचोली तलाव भरून घेण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही संबंधीत अधिकाऱ्यांना  दिल्या. या बैठकीस राष्ट्रवादी कॉग्रेस चे ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील, भाजप तालुका अध्यक्ष चेतनसिंह केदार, माजी नगराध्यक्ष रफीक नदाफ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close