राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नाभिक समाजासाठी धान्य वाटप
दहा किलो गहू व पाच किलो तांदळाचे वाटप
टेंभूर्णी (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माढा तालुका व माढा विधानसभा मतदार संघाच्या वतीने नाभिक समाजाला सरपंच प्रमोद कुटे यांच्या अध्यक्षतेखाली रोटरी हॉल टेंभूर्णी येथे मोफत धान्य (शिधा) वाटप करण्यात आला.
रमेश पाटील म्हणाले कोरोना रोगामुळे केलेले लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने कमी करून व्यवसाय सुरू झाले आहेत परंतु नाभिक समाजाचा व्यवसाय अध्याप बंदच आहे. त्यामुळे या समाजाला फुल नाही फुलाची पाकळी म्हणून दहा किलो गहू व पाच किलो तांदूळ वाटप करण्याचा निर्णय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने घेण्यात आला. व या समाजासाठी शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आमदार बबनदादा शिंदे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी माढा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष रमेश पाटील, कारखान्याचे संचालक रमेश येवले - पाटील, ग्रा पं सदस्य विजयकुमार कोठारी, तानाजी येवले - पाटील, गोरख देशमुख, महेंद्र वाकसे, अमोल डोईफोडे, विलास देशमुख, सोमनाथ कदम सह टेंभुर्णी व टेंभुर्णी परिसरातील नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमोद कुटे, रामभाऊ शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रस्ताविक ग्रा पं सदस्य गणेश केचे यांनी केली.
नाभिक समाजाला धान्यवाटप केल्याबद्दल ग्रा पं सदस्य डॉक्टर साळुंखे व योगेश साळुंखे यांनी आभार मानले.
0 Comments