Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रतिबंधित क्षेत्रातील संसर्ग कमी करा अक्कलकोट येथील आढावा बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या सूचना

प्रतिबंधित क्षेत्रातील संसर्ग कमी करा
अक्कलकोट येथील आढावा बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या सूचना


सोलापूर: अक्कलकोट शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज अक्कलकोट येथे दिले.
          अक्कलकोट येथील तहसील कार्यालयात कोरोनाविषयी आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. बैठकीला प्रांताधिकारी ज्योती पाटीलतहसीलदार अंजली मरोडनगरपालिकेच्या मुख्याधिकारी आशा राऊतग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोडतालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडउत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी उपस्थित होते.
           श्रीमती मरोड यांनी शहर व तालुक्यातील कोरोनाची स्थितीची माहिती दिली. शहरात सोलापूर आणि कर्नाटकमधून मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून संसर्ग वाढत आहे. शहरात तीन प्रतिबंधित क्षेत्र  असून शहर व तालुक्यात वीस जणांना बाधा झाली आहे. यातील चौघे मरण पावले असून सात रूग्ण बरे झाले तर नऊ रूग्णांवर उपचार सुरू आहे.
           श्री. शंभरकर म्हणालेप्रतिबंधित क्षेत्र कमी करून क्वारंटाईन कालावधी १४ दिवसांवरून २८ दिवस करा. पावसाळ्यात रूग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेता अधिक लक्ष द्या. रूग्ण संसर्ग आणि मृत्यूदर कमी करण्यावर अधिक भर द्या. प्रत्येक रूग्णांचा पाठपुरावा करा. वृद्धलहान बालके यांच्यावर जास्त फोकस करा. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सीसीटीव्ही बसवा. बाहेरच्या प्रवाशांवर आणि कंटेनमेंटमध्ये पोलिसांनी अधिक लक्ष द्याविना मास्क असेल तर दंडाशिवाय संस्थात्मक विलगीकरण करा.
          शहरात परवापासून तत्काळ सर्व्हे सुरू करायामध्ये रक्तदाबमधुमेहहृदयरोगदमाकॅन्सरगरोदर महिलाबालके अशा पद्धतीने करा. हा सर्व्हे एक दिवसाआड करण्याच्या सूचना श्री. शंभरकर यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिल्या. संशयित रूग्ण वाटल्यास त्याला त्वरित रूग्णवाहिकेतून दवाखान्यात पाठवा. रूग्णांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचे स्वॅब घेण्याच्या सूचनाही त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या.
          यावेळी प्रांताधिकारी श्रीमती पाटील यांनीही कोरोनाविषयी जागृतीबाबत सूचना केल्या.
Reactions

Post a Comment

0 Comments