Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोना रूग्णांवर धर्मादाय हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार


कोरोना रूग्णांवर धर्मादाय हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार


     सोलापूर(क.वृ.):- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना(MJ PJAY) व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM JAY) ह्या योजना एकत्रितपणे शासनाने कोव्हिडं 19 रूग्णांवर उपचार करण्यासाठी राबविण्यास चालू केले आहे. आशी माहिती कोव्हिडं19 कंट्रोलचे अधिकारी धनराज पांडे यांनी दिली आहे. 
      सदरची योजना ही राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई यांच्यामार्फत युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने चालवली जात आहे. त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे आहेत. सदर योजनेसाठी सोलापूरचे नोडल अधिकारी डॉ. वाघमारे हे जिल्हा समन्वय म्हणून काम करत आहेत. आपल्याला याबाबत काही शंका असल्यास त्यांना 8275095826 या मोबाईलवर संपर्क साधावा. या योजनेत समाविष्ट असलेल्या दवाखान्यात ही योजना 31 जुलैपर्यंत चालू असेल. रूग्णाचा झालेल्या खर्चाची प्रतीपूर्ती विमा कंपनीकडून राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मान्यतेने केली जाते. ज्या रुग्णालयाची नोंदणी मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 4, 41AA नुसार झालेली आहे. त्या रुग्णालयांनी 10% बेड राखीव ठेवून मोफत उपचार देणे आहे. आणि 10% टक्के बेड गरीब लोकांसाठी राखीव ठेवून त्यांना माफक दरात उपचार द्यावयाचे आहे.
सदर कार्यालयचा पत्ता 'जीवनदायी भवन' E.S.I.S रुग्णालय आवार,गणपत जाधव मार्ग मुबंई-400,018
फोन--022-24912291
ईमेल--ceo@jeevandayee.gov.in
वेबसाइट--jeevandayee.gov.in
मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 नुसार सोलापुरातील नोंदणीकृत रुग्णालय खलील प्रमाणे
01.सुरक्षा चारीटेबल ट्रस्ट मेडिकल अँड रीसर्च रीसर्च
02. एम एम पटेल चारीटेबल ट्रस्ट संचलित अश्विनी ग्रामीण रुरल पटेल चारीटेबल ट्रस्ट संचलित अश्विनी ग्रामीण रुरल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल व रिसर्च सेंटर गट नंबर 261 262 सोलापूर.
03. सुरक्षा चारिटेबल सोसायटी संचालित श्रीमती मल्लव्वाबाई वल्याळ चॅरिटेबल डेंटल हॉस्पिटल ,गणेश पेठ सोलापूर
04.अल फैज चॅरिटेबल ट्रस्ट मेडिकल अँड रिसर्च सेंटर,सोलापूर संचलित अल-फैज जनरल हॉस्पिटल, डॉ.अल्लमा इकबाल हॉल,80,सिद्धेश्वर पेठ सोलापूर
05. शेठ सखाराम नेमचंद जैन औषधालय व रुग्णालय ट्रस्ट संचलित गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय (सलग्न) शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालय 118/ 119 शुक्रवार पेठ, टिळक चौक, सोलापूर.
06. मल्लिकार्जुन हेल्थकेअर अँड रिसर्च सेंटर संचलित यशोधरा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल सिद्धेश्वर पेठ, जिल्हा परिषद जवळ, सोलापुर
07.श्री सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, होटगी रोड, दैनिक संचार जवळ,सोलापूर.
08.पैरवी शिक्षण प्रसारक मंडळ,सोलापूर संचलित महिला होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज व युगधंर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर 238/1बी कोळीगिरी नगर होटगी रोड, मंजरेवाडी.
09.लायन्स क्लब ऑफ सोलापूर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित लायन्स मधुराबाई फत्तेहचंद दमणी हॉस्पिटल,लायन्स ब्रिजमोहन फोफलिया नेत्रालय ,125 दमाणी नगर,सोलापूर
10.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल ट्रस्ट संचलित लोकमंगल जैविक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ,नीलम नगर एम.आय.डी.सी.प्लॅट न.02 जुना कुंभारी रोड, सोलापूर.
11.इंडियन कँन्सर सोसायटी,8389/2बी रेल्वे लाईन्स, सोलापूर.
12.गांधींनाथा रंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान संचलित गांधींनाथा रंगजी हॉस्पिटल,13 बुधवार पेठ, सोलापूर.
13.डॉ.कासलीवाल मेडिकल केअर व रिसर्च सेंटर,सोलापूर संचलित कासलीवाल हॉस्पिटल, वस्तूरबा मार्केटजवळ,196,बुधवार पेठ सोलापूर.
14.धनराज गिरीजी हॉस्पिटल ट्रस्ट,4,रेल्वे लाइन्स, सोलापूर.
           सार्वजनिक आरोग्य विभागाने 21 मे 2020 रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार महापालिका आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांनी शासकीय,सार्वजनिक आणि खासगी रुग्णालय 80:20 प्रमाणे अंगीकृत/ अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 80% बेड हे शासकीय दराने महापालिकेच्या नियंत्रित करावयाचे आहेत व 20% बेड खाजगी रुग्णालयाने नियंत्रित करावयाचे आहेत एकूण 80% पैकी 25% बेड हे सदर योजनेत महात्मा फुले योजनेस राखीव आहेत व त्यात आठ पॅकेजेस समावेश करण्यात आलेले आहेत. सदर आठ पॅकेजची माहिती आणि उपलब्द बेडची माहिती सर्व रुग्णालयानी त्यांच्या दर्शनी भागावर ठळकपणे पहाता येईल असे लावावे.
Reactions

Post a Comment

0 Comments