समाजातील उपेक्षित,वंचित घटकापर्यंत शाहू फौंडेशनच्या माध्यमातून मदत पोहचविणार--अभिषेक कांबळे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 2, 2020

समाजातील उपेक्षित,वंचित घटकापर्यंत शाहू फौंडेशनच्या माध्यमातून मदत पोहचविणार--अभिषेक कांबळे

समाजातील उपेक्षित,वंचित घटकापर्यंत शाहू फौंडेशनच्या माध्यमातून मदत पोहचविणार--अभिषेक कांबळे


सांगोला (प्रतिनिधी)  समाजाचे आपण देणे लागत आहे,समाजाने आपणाला गरिबांच्या,उपेक्षितांच्या, शोषितांच्या अडचणी सोडविण्यासाठी बळ दिले आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात ही आपण लोकराजा छत्रपती शाहू फाऊंडेशन च्या माध्यमातून तालुक्यातील उपेक्षितांच्या,शोषितांच्या घरापर्यंत मदत पोहचविणार असल्याचे मत युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते अभिषेक कांबळे यांनी व्यक्त केले. लोकराजा छत्रपती शाहू फाउंडेशन च्या माध्यमातून कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावाने ज्या लोकांच्या हाताला रोजगार नाही,आणि जे लोक लॉक डाऊन च्या कालावधीमध्ये आर्थिक विवंचनेत आहेत,अशा शिरभावी (रणदिवेवस्ती)  ता--सांगोला येथील चाळीस कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे किट आणि मास्क वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना  ते बोलत होते.
      सध्या देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे  गोरगरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.सांगोला तालुका हा परंपरेने दुष्काळी तालुका असून अजूनही गरीब व गरजू लोकांना रोजगार उपलब्ध नाहीत या परिस्थितीत सामाजिक बांधिलकी म्हणून मदत करण्याच्या भावनेतून लोकराजा छत्रपती शाहू फाऊंडेशन च्या वतीने यापूर्वी खिलारवाडी,गायगव्हाण, महुद बु,आदि गावातील निराधार,विधवा व मोलमजूरी करणाऱ्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किटआणि मास्क चे वाटप करण्यात आले. 


          प्रसंगी सांगोला तालुक्यातील शेतमजूर,कामगार,निराधार,विधवा महिला यांच्या हाताला काम नसल्याने अडचणीत असून व्यावसायिक,नोकरदार व तरुण वर्गाने एकत्रित येऊन गरीब व गरजू लोकांना मदत करावी असे आवाहन ही यावेळी लोकराजा छत्रपती शाहू फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा.अभिषेक कांबळे यांनी केले.तर लोकराजा छत्रपती शाहू फाउंडेशन चा उपक्रम स्तुत्य असून,येणाऱ्या काळात ही त्यांच्याकडून असेच सामाजिक कार्य घडत राहू,आमच्या गावाच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो असे मत सामाजिक कार्यकर्त्या सखुबाई वाघमारे यांनी व्यक्त केले.
          यावेळी सरपंच पांडुरंग बंडगर,युवा नेते अभिजित कांबळे, पोलीस पाटील सोमनाथ ढोले,सामाजिक कार्यकर्त्या सखुबाई वाघमारे,माजी ग्रामपंचायत सदस्य पोपट रणदिवे,संतोष रणदिवे,संजय रणदिवे,भगवान रणदिवे,भीमराव रणदिवे,महेश रणदिवे,अक्षय रणदिवे आदि मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages