Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूजमध्ये सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस बांधवास सॅनिटायझर व मास्कचे वाटप

अकलूजमध्ये सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस बांधवास सॅनिटायझर व मास्कचे वाटप          



अकलूज( प्रतिनिधी) -संरपच सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष व माजी पोलीस अधिकारी लक्ष्मणराव सरवदे यांच्या वाढदिवसा निमित्त अकलुज मधील सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना मास्क व सॅनिटायजर वाटप करण्यात आले.                                                                            
   लक्ष्मणराव सरवदे हे सामाजिक व राजकीय पटलावरील कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.माळशिरस विधानसभा मतदारसंघात त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी तीन नंबरची मते मिळवली होती. सरपंच सेवा संघाचे माध्यमातून कार्य करीत असताना, त्यांनी नेहमी सामाजिक हिताच्या दृष्टीने विचार केला.कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना, त्यांनी स्व:कर्तृत्वावर आणि राबवित असलेल्या विविध प्रकारच्या सामाजिक कार्यावर आपल्या नावाचा ठसा उमटवला.                                
    त्यांच्या कार्याची दखल घेऊन शिवसेनेतुन त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळाली. तर मिळालेल्या संधीचे सोने करीत त्यांनी माळशिरस विधानसभा निवडणुकीत तीन नंबरची मते मिळवली.  त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  स्वाभिमानी बिग्रेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन भैय्या सुरवसे पाटील व आणासाहेब सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली  अकलूजमध्ये पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले.
           यावेळी बोलताना स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहनभय्या सुरवसे पाटील म्हणाले की पोलीस बांधवास, माजी पोलीस अधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले हे भाग्याचे समजतो. सरवदेसाहेबांना स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे राज्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो असे म्हणाले.
Reactions

Post a Comment

0 Comments