आ.रणजितसिंह मोहिते-पाटील होमकोरंन्टाइन मुक्त
अकलूज(तालूका प्रतिनीधी) -आमदारकीची शपथ घेऊन अकलूजला परतल्या नंतर भाजपाचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी स्वतःला होम कॉरंटाईन करून घेतले होते.आज दि.२जून रोजी त्यांचा होमकाॕरंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ते स्वता अकलूज उपजिल्हा रुग्णालयात येऊन त्यांनी तपासणी करुन घेतली.व काॕरंटाईन मुक्त झाले.त्यांचेसोबत त्यांच्या पत्नी सौ.सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील यांनीही तपासणी करुन घेतली.व त्या ही काॕरंटाईन मुक्त झाल्या.
या वेळी तालूका आरोग्य अधिकारी डाॕ.रामचंद्र मोहिते,उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रमुख डाॕ.सौ.सुप्रिया खडतरे,डाॕ.संतोष खडतरे,डाॕ.मोनिका मिसाळ(पवार) आदी उपस्थित होते.
विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेलेल्या आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा मुंबईत आमदारकीचा शपथविधी संपन्न झाला. शपथविधी उरकून आमदार मोहिते पाटील आपल्या गावी अकलूज येथे परतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील यांनी अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील याही मुंबईला गेल्या होत्या त्यामुळे त्यांनीही यावेळी तपासणी करून घेतली होती. व त्या ही होमकाॕरंटाईन झाल्या होत्या. रेड व ऑरेंज झोनमधुन प्रवास व वास्तव्य करून सोलापूर जिल्ह्यात आलेल्या नागरिकांना कॉरंटाईन करावे असा अध्यादेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढला होता. त्या आदेशाचे तंतोतंत पालन करत आमदार रणजितसिंह मोहिते -पाटील स्वता सपत्निक होम कॉरंटाईन झाले होते. होम काॕरंटाईनच्या कालावधीत आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यात कोरोना मुळे निर्माण झालेली परिस्थीती व शेती,सहकार,अर्थव्यवस्था,आरोग्य सुविधा आदी संदर्भात जिल्ह्यातील विवीध मान्यवरांशी आॕनलाईन चर्चा करुन अडीअडचणी समजून घेतल्या होत्या.व त्यावर उपाय योजना करण्यासाठी मुख्यमंञ्यांना पञाद्वारे विवीध मागण्यांचे निवेदन दिले आहे
0 Comments