Hot Posts

6/recent/ticker-posts

आशा टोणपे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस बांधवास मास्क व सॅनिटायझरचे वाटप

आशा टोणपे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस बांधवास मास्क व सॅनिटायझरचे वाटप


 अकलूज( प्रतिनिधी) - काही अवधीतच राजकीय पटलावर कर्तृत्ववान कार्याचा ठसा उमटवणाऱ्या शिवसेना महिला आघाडी उपप्रमुख सोलापूर जिल्हा सौ. आशाताई टोणपे यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज येथे पोलीस बांधवास स्वाभिमानी ब्रिगेड संघटना यांच्या वतीने व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.
            सुसंस्कृत राजकारणी व उत्कृष्ट विचारसरणी तर समाजाबद्दलची व त्यांच्या विकासाबद्दल असणारी आत्मीयता या गुणांमुळे सर्वसामान्यांमध्ये ओळखल्या जाणाऱ्या आशाताई टोणपे यांनी दहा वर्ष जिजाऊ-ब्रिगेड माढा तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली. सामाजिक प्रश्नांसाठी आंदोलने उपोषणे करीत त्या समाजकार्यात अग्रस्थानी आणि तत्पर राहिल्या.! त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आशाताई टोणपे यांची शिवसेना महिला आघाडी उपप्रमुख सोलापूर जिल्हापदी निवड करण्यात आली.
            त्यांची उपप्रमुखपदी निवड होताच त्यांनी कौतुकास्पद आणि प्रेरणादायी कार्याला चालना दिली. तर महिला आघाडी बळकट आणि अधिक मजबूत करण्यासाठी कार्यरत आहेत. तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या विविध प्रश्नांना न्याय देण्याचे कामही त्या युद्ध पातळीवरती मोठ्या उत्साहात करताना दिसताहेत. यामुळेच तमाम महिला वर्गांचा अधिकचा कल शिवसेना महिला आघाडीकडे वळताना दिसत आहे.पक्षाने टाकलेली जबाबदारी श्रद्धास्थानी मानून त्यांनी आपल्या कार्याला उजाळा देत आहेत. अशा कर्तुत्ववान हिरकणीच्या वाढदिवसानिमित्त आमच्या संघटनेचे माध्यमातून छोटेसे कार्य घडले हे आम्ही भाग्याचे समजतो असे स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील म्हणाले.
Reactions

Post a Comment

0 Comments