Hot Posts

6/recent/ticker-posts

कुर्डुवाडी येथे विविध उपक्रमांनी टोनपे यांचा वाढदिवस साजरा

कुर्डुवाडी येथे विविध उपक्रमांनी टोनपे यांचा वाढदिवस साजरा 


अकलूज ( प्रतिनिधी)  शिवसेना महिला आघाडी उपप्रमुख सोलापूर जिल्हा सौ. आशाताई टोणपे यांच्या वाढदिवसानिमित्त कुर्डुवाडी येथे गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वाभिमानी ब्रिगेड संघटना यांच्या वतीने, आशाताई टोनपे यांच्या उपस्थितीत सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील,सुहासदादा टोनपे, आण्णासाहेब सुरवसे, तुषार ननवरे, विलास दोलतोडे, प्रकाश चोपडे आदी उपस्थित होते.
    तर कुर्डुवाडी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक डोंगरे यांचे उपस्थितीत पोलीस कर्मचारी यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. तर उमीद आश्रम शाळा येथेही मुलांना खाऊ, मास्क, व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.सदरचे सर्व कार्यक्रम शासनाचे नियम पाळत करण्यात आले. यावेळी सौ.आशाताई टोनपे यांचे निवासस्थानी केक जपून वाढदिवस साजरा करण्यात आला.
Reactions

Post a Comment

0 Comments