कृषी पदवीधर संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अमन मुलाणी
अकलूज(प्रतिनिधी) -कृषी पदवीधर संघटनेच्या विद्यार्थी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी महाळुंग येथील अमन मुलाणी यांची निवड झाली आहे. या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महेश कडूस् पाटील यांनी मुलाणी यांना निवडीचे पत्र दिले आहे.
महाराष्ट्रातील कृषी व संलग्न पदवीधर बांधवांची कृषी पदवीधर संघटना कार्यरत आहे. या संघटनेच्या विद्यार्थी आघाडीच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी अमन मुलाणी यांची निवड झाली आहे. मूळ महाळुंग येथील रहिवासी असलेले अमन मुलाणी हे सध्या वडाळा,जिल्हा सोलापूर येथील लोकमंगल कृषी महाविद्यालयात कृषी पदवीचे शिक्षण घेत आहेत. जिल्ह्यातील युवक विद्यार्थी व कृषीवलांचे प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी कृषी पदवीधर संघटनेची विद्यार्थी आघाडी कार्य करणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष अमन मुलाणी यांनी सांगितले. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महेश कडूस् पाटील, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुमित धामणे पाटील, उपाध्यक्ष मनीष भदाणे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुरज खोमणे पाटील, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अभिजीत कांबळे यांनी माझ्यावर हा विश्वास टाकल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो .त्यांच्या विश्वासास पात्र राहून या संघटनेचे कार्य वाढवणार असल्याचे अमन मुलाणी म्हणाले. निवडीनंतर विविध स्तरातून अमन मुलाणी यांचे अभिनंदने होत आहे.
0 Comments