कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी
रेड झोन मधील नागरिकांशी संपर्क टाळावा प्रांताधिकारी-सचिन ढोले
पंढरपूर : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिक, विदयार्थी, पर्यटक आणि मजूर यांना आपआपल्या गावी जाण्यासाठी तसेच जिल्हयात येण्यासाठी राज्य शासनाने कार्यपध्दती निश्चित केली आहे. त्या अनुषंगाने परराज्यातून तसेच परजिल्ह्यातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेड झोन क्षेत्रामधून येणाऱ्या नागरिकांशी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी संपर्क टाळावा असे आवाहान प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे परराज्यातून तसेस जिल्ह्यातील तसेच सोलापूर शहरातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. रेड झोन क्षेत्रातून शासकीय कर्मचारी-अधिकारी, व्यापारी तसेच वैद्यकीय क्षेत्राशी संबधित नागरिकांचा सोलापूर शहरातील रेड झोन क्षेत्राशी संबंध येत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी रेड झोन मधील नागरिकांशी अतिमहत्वाच्या कामासाठी व कमी वेळासाठी योग्य ती काळजी घेवूनच संपर्क ठेवावा. तसेच अनावश्यक कारणाने शहरात जाणे टाळावे. पंढरपूर तालुक्यात रेड झोन क्षेत्रातून येणाऱ्या नागरिकांना 14 दिवसांचे संस्थात्मक क्वारंटाईन व आरोग्य तपासणी बंधनकारक करण्यात आले असून, उपचारासाठी वैद्यकीय यंत्रणाही सज्ज असल्याचेही प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.
तसेच पावसाळा सुरु असल्याने कोरोनाच्या संसर्गाबरोबच डेंग्यु, मलेरिया तसेच इतर साथीचे आजाराच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी अशा सूचनाही प्रांताधिकारी ढोले यांनी यावेळी दिल्या.
0 Comments