Hot Posts

6/recent/ticker-posts

आमदार बबनदादा शिंदे यांच्या आवाहनास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार बबनदादा शिंदे यांच्या आवाहनास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

माढा,कुर्डूवाडी व निमगाव (टें) येथील शिबीरामध्ये 486 जणांचे विक्रमी रक्तदान  


माढा/प्रतिनिधी- (राजेंद्र गुंड) - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार माढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे यांनी माढा तालुक्यातील व मतदारसंघातील जनतेला कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान करण्यासाठी केलेल्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून माढा व कुर्डूवाडी आणि निमगाव (टें) येथील शिबीरांमध्ये 486 जणांना विक्रमी रक्तदान केले आहे.

सध्या देशासह राज्यामध्ये कोरोना  विषाणूने अक्षरशः थैमान घातले असून दररोज कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे.हा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी सरकार शर्तीचे प्रयत्न करीत आहे.अशा भयंकर स्थितीमध्ये रूग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज आहे ही बाब लक्षात घेऊन आमदार बबनदादा शिंदे यांनी माढा तालुक्यातील व मतदारसंघातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.त्यानुसार माढा येथील शिबीरामध्ये 150, कुर्डूवाडी येथे 225 तर निमगांव टें येथील शिबीरामध्ये 111 अशा एकूण 486 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.या शिबीरातील रक्तदात्यांस विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या वतीने एक हॅन्ड सॅनिटायझर बॉटल व मास्कचे वाटप सोशल डिस्टन्ससिंगचे व शासनाच्या इतर नियमांचे पालन करीत करण्यात येत आहेत.

माढा तालुका व मतदारसंघातील विविध ठिकाणी 10 जून 2020 पर्यंत विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन सुरू आहे तेंव्हा कोरोनासारख्या वैश्विक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी.या विविध ठिकाणच्या शिबीरामध्ये 1500 ते 2000 रक्त पिशव्यांचे संकलन करण्णाचा मानस आ.बबनदादा शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

या विविध ठिकाणच्या शिबीराप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह (भैय्या) शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील, कारखान्याचे संचालक वामनराव उबाळे, युवा नेते संदीप पाटील, झुंजारनाना भांगे, हनुमंत पाडूळे, सुरेश बागल,आप्पासाहेब उबाळे, सरपंच रविंद्र शिंदे,नगरसेवक सुभाष जाधव, राजू गोटे, शहाजी चवरे,दत्तात्रय अंबुरे,भारत गाडे,धनंजय मोरे,संतोष वरपे, बिभीषण डांगे,प्रताप शिंदे, शहाजी शिंदे,दत्तात्रय काकडे, मुख्य शेतकी अधिकारी संभाजी थिटे,मुख्य ऊस विकास अधिकारी महेश भादुले,शेती
अधिकारी सुनिल बंडगर अॅग्रो ओव्हरसिअर चांदणे व्ही.एस, बालाजी गिड्डे,मारूती शेंडगे, शंकर जाधव,प्राचार्य सागर थोरात,प्रा.आशिष रजपुत, संभाजी पाटील,महादेव टोणपे, विजय गव्हाणे यांच्यासह ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments