मंद्रूप ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना,गरिबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप
मंद्रूप- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सगळेच जण आर्थिक अडचणीत सापडले आहेत.यातून विविध गावातील ग्रामपंचायतीचे कर्मचारीही नाहीत, कर्मचा-यांची झालेली अडचण ओळखून मंद्रूप भाजप ग्रामविकास आघाडीचे पॅनलप्रमुख मळसिध्द मुगळे यांनी 25 कर्मचा-यांना एक महिन्यांचे जीवनावश्यक वस्तूचे तसेच डवरी समाजातील गरजूंना दहा पोते अन्नधान्य तसेच अन्य गरजूंना 300 पाण्याचे झार वाटप केले आहे.
कोरोना लाॅकडाऊनमुळे गावातील सर्व करवसुली आणि गावचा आठवडा बाजार बंद असल्याने ग्रामपंचायतीसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारी होत नसल्यामुळे या सर्व कुटुंबाचे हाल होत आहेत याची जाणीव झाल्याने या सगळ्या कर्मचा-यांना एक महिन्यांचे गहू,ज्वारी,तांदूळ, साखर,चहापत्ती,शेंगा,तूरडाळ आदी जीवनावश्यक वस्तू दिले आहेत.
यावेळी सरपंच कलावती खंदारे यांच्या हस्ते या कर्मचा-यांना जीवनावश्यक वस्तूचे वितरण करण्यात आले.
यावेळी डवरी गोसावी समाजातील गरजू लोकांचे हाल पाहून या लोकांना पाच पोते गहू,पाच पोती ज्वारी धान्य देण्यात आले तसेच टाकळी येथे क्वारंटाइनमध्ये असलेल्या नागरिकांना तीनशे पाण्याचे झार तसेच अनेक गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप मळसिध्द मुगळे यांनी दिले आहे.
यावेळी बोलताना मळसिध्द मुगळे यांनी कोरोना लाॅकडाऊनमुळे अनेकजण अडचणीत सापडले आहेत. विशेषत: गरीब लोकांचे आणि कर्मचार्यांचे हाल होत आहेत.त्यांचे हाल पाहावत नसल्यामुळे आपल्या परीने शक्य ती मदत देण्याचा आपण छोटासा प्रयत्न केला आहे.असे त्यांनी वृत्तदर्पणशी बोलताना सांगितले.
यावेळी उद्योजक मिथुन मुगळे,सतीश सुतार,अनिल म्हेत्रे,चिदानंद मुगळे,रवी नंदुरे,निंगू ख्याडे,जगदीश हेळकर,
सिद्धेश्वर नंदुरे,अंबाजी मेणकाळे,शिवराज मुगळे , आदी उपस्थित होते.मळसिध्द मुगळे यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक होत आहे.
0 Comments