गुटखा विक्रीतील "डॉन"लवकरच होणार गजाआड -प्रदिप राऊत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, May 17, 2020

गुटखा विक्रीतील "डॉन"लवकरच होणार गजाआड -प्रदिप राऊत

गुटखा विक्रीतील "डॉन"लवकरच होणार गजाआड -प्रदिप राऊत 


यापुढे गुटखा विक्री करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई- मंगेश लवटे




सांगोला (जगन्नाथ साठे):- सांगोला शहर आणि तालुक्यात लॉक डाऊन असताना गुटखा आणि तंबाखू जन्य वस्तुंची विक्री खुलेआम आणि चढ्या दराने होत आहे. अशा गुटखा विक्रीला पायबंद घालण्यासाठी सांगोला शहर आणि तालुक्यात अन्न सुरक्षा विभागाने पोलिसांच्या सहकार्याने अनेक ठिकाणी धाडी टाकून गुटखा विक्री करणाऱ्यावर गुन्हे दाखल केले आहेत.येणाऱ्या काळात ही अशा अवैध गुटखा विक्रीला पायबंद घालण्यासाठी गोपनीय माहिती दारामार्फत गुटखा विक्रीतील "डॉन वर" कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्नसुरक्षा व भेसळ विभागाचे सहायक आयुक्त प्रदिप राऊत व अन्नसुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांनी दिली.

       सध्या कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले आहे.लॉक डाऊन असतानाही मोठ्या प्रमाणात गुटख्याची ने--आण होत असल्याची माहिती नागरिकांतून मिळत आहे.अन्न सुरक्षा व भेसळ विभागाकडे असणाऱ्या पुरेशा मनुष्यबळा अभावी अशा गुटखा विक्री करणाऱ्यांना  सोन्याचे दिवस आले आहेत.पण त्यातून ही मार्ग काढतअन्न सुरक्षा व भेसळ विभागाचे सोलापूर जिल्हयाचे सहायक आयुक्त प्रदिप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांनी व सांगोला पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक गुटखा  विक्री करणारावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे चोरून आणि खुलेआम पणे गुटखा विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.येणाऱ्या काळात ही गोपनीय माहिती दाराच्या मदतीने सांगोला शहर आणि तालुक्यातील गुटखा विक्री करणारे मोठे मासे गळाला लागणार असल्याची माहिती अन्नसुरक्षा व भेसळ विभागाचे आयुक्त प्रदीप राऊत आणि सांगोला विभागाचे अन्न सुरक्षा व भेसळ अधिकारी मंगेश लवटे यांनी दिली.

     नागरिकांनी ही किराणा दुकानात,किंवा अन्य ठिकाणी गुटखा किंवा तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होताना दिसून आली तर अन्न सुरक्षा व भेसळ विभागाला माहिती द्यावी असे आवाहन ही शेवटी लवटे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages