संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रच्या वतीने निवेदन PM व CM यांना पाठवले. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 13, 2020

संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रच्या वतीने निवेदन PM व CM यांना पाठवले.

 संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रच्या वतीने  निवेदन  PM  व  CM यांना पाठवले.

[13/04, 21:43] L21 51: प्रति, 
मा. मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय, मुंबई - ४०००२०. 

विषय:- कोरोना किंवा इतर जैविक युद्धात मृत डॉक्टर व कर्मचारी यांना शहिदांचा दर्जा देण्यात यावा.

महोदय, 
उपरोक्त विषयान्वये आपणास संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रच्या वतीने नम्र निवेदन  करण्यात येते की, कोरोना या महामारिने जगभरामध्ये थैमान घातले आहे. चीन, इटली, अमेरिका, फ्रांस हि प्रगत राष्ट्रे देखील हतबल झाली आहेत. आंतरराष्ट्रीय स्थरावरील हालचाली पाहता हे जैविक महायुद्ध सुरु आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात आपल्या भारत देशामध्येही कोविड 19 (कोरोना) या महामारिने थैमान घातले आहे. देशातील सर्वच राज्यात हा विषाणु आनेक मार्गाने पोहचला आहे, राज्यातील प्रमुख शहरात युद्धजन्य परिस्थीति निर्माण झाली आहे. या युद्धात आपल्या जिवाची पर्वा न करता डॉक्टर लढा देत आहेत या संवेदशील परिस्थिती मध्ये नागरिकांना सेवा देणारे डॉक्टर व हॉस्पीटल चे कर्मचारी सुद्धा मृत झाले आहेत.
आरोग्य क्षेत्रातील ज्या व्यक्ती आपल्या जीवाची पर्वा न करता आपली सेवा बजावत या विषाणूशी धैर्याने लढा देत आहेत, त्यांच्या या देशाप्रती प्रामाणिक सेवेची योग्य दाखल घेऊन हि देश सेवा बजावत असताना ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना शाहिद घोषित करण्यात यावे व त्यांचा यथोचित सन्मान करण्यात यावा.  
            या परिस्थीतीत सेवा देणारे डॉक्टर्स व स्टाफ कर्मचारी मृत्यूमुखी पडले तर त्यांना शहिदांचा दर्जा देण्यात यावा व तसेच त्यांच्या कुटुंबाला शहिदांच्या कुटुंबाप्रमाने सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात. देशामध्ये थल सेना, जल सेना, वायू सेना, पोलीस इ. संघटीत कर्मचाऱ्यांचा देश सेवेचे कर्तव्य बजावत असताना मृत्यू आल्यास आपण सरकार या नात्याने सर्वोतपरी मदत करता. त्याच प्रमाणे सद्याच्या विदारक परिस्थिती मध्ये प्रतक्ष्य कार्यरत असलेले सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स इ. मृत झाल्यास शहीद घोषित करून त्याच्या परिवाराला  सर्वोतपरि मदत करावी.
सद्या हि आत्यआवश्यक सेवा बजावत असलेल्या कर्मचार्यांप्रती आपण सर्वांनी विविध मार्गाने सहानभूती व आदर व्यक्त केला आहे. परंतु प्रतक्ष्य त्यांच्या कुटंबाला व त्यांना देखील हा निर्णय तात्काळ घेऊन त्यांच्या देश सेवेची यथोचित नोंद घेतली जात आहे हा विश्वास देऊन त्यांच्या कार्याप्रती प्रोत्सहन मिळण्यासाठी योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी. 
या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर निर्णय जाहिर करावा हि नम्र विनंती.
धन्यवाद.

आपले स्नेहांकित, 

इंजि. मनोजकुमार गायकवाड  
कार्यकारणी सदस्य तथा,
उमेदवार पुणे विभाग पदवीधर मतदार संघ,
संभाजी ब्रिगेड.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages