विश्वभुषण, विश्वरत्न, महामानव, भारतीय राज्यघटनेचे निर्माते बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांची १२९ वी जयंती अशी साजरी करा.
सप्रेम जयभीम धम्म बंधु भगिनींनो,
मी डॉ. औदुंबर मस्के माजी श्रामणेर अर्थात भन्ते निग्रोध ज्योती सर्व धम्मबांधव व बाबासाहेबांच्या अनुयायांना आवाहन करतो की,
आज करोना महामारीच्या संकटकाळात मंदिर, मशीद, चर्च या सर्व धार्मिक स्थळांचे दरवाजे बंद असताना...
भारतीय
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेल्या घटनेच्या कलम १४४
नुसार जमावबंदी लागू आहे. मी तर म्हणेन की, *२७ मार्च पासूनच डॉ.
बाबासाहेबांची जयंती भारतात सुरु आहे.*
आपण
बाबासाहेबांच्या अनुयायांवर या कठीण काळात भारतीय राज्यघटनेच्या कलम १४४
चा, पर्यायाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान राखण्याची जबाबदारी आहे.
त्यामुळे या वर्षी १४ एप्रिलला, १४४ कलमाचा आदर राखून, गर्दी न करता आप-आपल्या घरी राहून जयंती साजरी करूया व करोनाला हरवूया.
*जयंती कशी साजरी कराल??*
१) १४ एप्रिल ला सकाळी लवकर उठून घर सॅनिटाझरने स्वच्छ करा. आंगण साफ करून सुरेख रांगोळी काढा.
2)
सकाळी ११:०० वाजता पांढरेशुभ्र कपडे परिधान करून आपल्या घरातील तथागत
भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करा. त्रिसरण पंचशील
घेवून २२ प्रतिज्ञा मोठ्याने म्हणून मोबाईल वर रेकॉर्ड करा.
३) संकल्प करा की,
"आज
पासून लॉकडाऊन संपेपर्यंत दररोज एक तास *बुद्ध आणि त्यांचा धम्म* व
*भारताचे संविधान* या ग्रंथाचे वाचन करेन." व याचे पालन १४ एप्रिल पासून
सुरू करा.
४) घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून गोड-धोड करून खा.
५) गोर गरीबांना अन्न, जीवनावश्यक वस्तूंचे दान द्या.
६) रात्री घरावर रोशनाई करा. अंगणात दिवे लावा.
७) या सर्व गोष्टींचे फोटो काढा व आपल्या सोसायटीच्या किंवा फॅमिली ग्रुप वर शेयर करा.
८) अॉनलाईन रांगोळी, चित्रकला, प्रश्नमंजुषा स्पर्धा घरात बसूनच घ्या.
९) हे सर्व करताना कटाक्षाने बाहेर जावे लागणार नाही, कलम १४४ चे उल्लंघन होऊन घटनाकारांचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्या.
*अशा प्रकारे या वर्षी घरी बसून घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करुया व करोनाला हरवूया.*
लक्षात ठेवा माझ्या प्रिय धम्म बंधू-भगिनींनो,
डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगातला सर्वोत्कृष्ट असा विज्ञानावर
आधारलेला बुद्ध धम्म दिला आहे. आपण जर कटाक्षाने पंचशिलाचे व आरिय
अष्टांगिक मार्गाचे पालन केले तर आपल्याला करोनाची कधीच बाधा होणार नाही
याची खात्री बाळगा.
!! जय भीम !!
!!! नमो बुध्दाय !!!
*चला घरी राहून जयंती साजरी करूया...*
*करोनाला हरवूया... !!!


No comments:
Post a Comment