नवीन बोअरवेल्स व बोअरवेल दुरूस्तीसाठी परवानगी मिळावी -डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 15, 2020

नवीन बोअरवेल्स व बोअरवेल दुरूस्तीसाठी परवानगी मिळावी -डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील

नवीन बोअरवेल्स व बोअरवेल दुरूस्तीसाठी  परवानगी मिळावी -डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील    


अकलूज ( प्रतिनिधी ) - सोलापूर जिल्ह्यातील शेतीसाठी व पिण्याचे पाणी पुरवठा सुरळीत रहाणेसाठी नवीन बोरवेल घेणे व बोरवेल दुरुस्ती करणे यासाठी वापरण्यात येणारे यंत्र वहाने यांना अत्यावश्यक बाब म्हणून काम करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समिती सोलापूर यांचेकडे केली आहे.पुढे डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील म्हणाले, सोलापुर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणुन ओळखला जातो. दरवर्षी जिल्हयात सरासरी पेक्षा कमीच पाऊस पडत असतो. यामुळे उन्हाळ्यात शेतीसाठी व पिण्याचे पाण्याची नेहमीच टंचाई होत असते. सद्या एप्रिल महीना चालु असुन जिल्हयात अनेक ठिकाणी विहिरी आटु लागल्या आहेत. बोरचे पाणी कमी होऊ लागले आहे. सद्या कोरोना संसर्गामुळे लाॅकडाऊन केले आहे. त्यामुळे बोअरवेल्स मशिनला परवानगी दिली नाही. त्यामुळे शेतकरी बोअर घेऊ शकत नाही. यामुळे शेतीचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  सोलापुर जिल्हयातील शेतीसाठी व पिण्याचे पाणी पुरवठा सुरळीत राहणेसाठी नवीन बोअरवेल घेणे बोअरवेल दुरूस्ती व यासाठी वापरणेत येणारे यंत्र तसेच वहाने यांना अत्यावश्यक बाब म्हणुन  काम करणेस परवानगी देणेत यावी अशी मागणी  
डाॅ.धवलसिंह प्रतापसिंह मोहीते-पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages