राजकारण करण्याची ही वेळ नाही, आम्ही सरकारसोबतच- गिरीश महाजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 15, 2020

राजकारण करण्याची ही वेळ नाही, आम्ही सरकारसोबतच- गिरीश महाजन

राजकारण करण्याची ही वेळ नाही, आम्ही सरकारसोबतच- गिरीश महाजन

मुंबई | राजकारण करण्याची ही वेळ नाही, आम्ही सरकारसोबतच आहोत, असं भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन म्हणाले आहे. कोरोनाच्या कठीण काळात राजकारण करण्याची ही वेळ नाही. भारतीय जनता पक्ष सरकारला सगळ्या पातळीवर सहकार्य करेल, असं ते म्हणाले.
वांद्र्याच्या घटनेवरही गिरीश महाजन यांनी आपलं मत व्यक्त केलं. वांद्र्यातील घटना पुन्हा होता कामा नये, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसंच त्या लोकांच्या हाती सामान नव्हतं आणि वांद्र्याहून युपीला ट्रेनही जात नाही मग लोकांना नक्की जायचं कुठं होतं? असा सवाल करत त्यांनी केला.
राजकारण किंवा सरकारवर टीका करण्याची ही वेळ नाही, या संकटाला हातात हात घालून सामोरे जायला हवे, असंही गिरीश महाजन म्हणाले. एका वृत्तवाहिनीशी त्यांनी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राती सद्य परिस्थिती पाहता सरकारने अधिक कडक पावलं उचलायला हवीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दुसरीकडे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. परप्रांतीय मजूरांची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. राज्य सरकार काम करण्यात कुठेतरी कमी पडतंय याचेच हे लक्षण आहे, असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages