आज सायंकाळी दिल्लीत केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक होणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 15, 2020

आज सायंकाळी दिल्लीत केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक होणार

आज सायंकाळी दिल्लीत केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक होणार

नवी दिल्ली : आज सायंकाळी दिल्लीत केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी होणार आहे. या बैठकीत कोरोना विषाणू तसेच लॉकडाऊन संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता काल नरेंद्र मोदी यांनी देशात ३ में पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली होती. काळ त्यांनी देशातील नागरिकांसोबत सवांद साधत लॉकडाऊन ३ में पर्यंत वाढवणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान २० एप्रिल नंतर काही शहरात लॉकडाऊन स्थितील करण्याचे संकेत दिले आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बुधवारी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नियमावलीनुसार, सर्व आंतरराज्यीय विमानवाहतूक, ट्रेन (पॅसेंजर), सर्व शैक्षणिक संस्था, औद्योगिक आणि कमर्शियल कामे, हॉटेल, टॅक्सी, ऑटोरिक्षा, सायकल रिक्षा, चित्रपटगृहे, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्वीमिंग पूल, बार, कोणताही सार्वजनिक कार्यक्रम, सर्व धार्मिक कार्यक्रम बंद राहणार आहे. या नियमावलीमध्ये हवाई सेवा, रेल्वे सेवा, टॅक्सी, मेट्रो, सब यांसारख्या सर्व सेवा बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
यासोबतच केंद्र सरकारने या नियमावलीमधून रुग्णालये, शेती, ऑनलाईन टीचिंग, किराणा दुकान, मासेमारी या सर्वांना सवलती दिल्या आल्या आहेत. या सर्व सवलती ग्रामीण भागांत आणि हॉटस्पॉट्स नसलेल्या क्षेत्रांसाठी असतील. या सूचनांमध्ये ग्रामीण भागातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या मजूरांना जाण्या-येण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातील कामगारांना या नियमातून वगळण्यात आले आहे. या सूचनांमध्ये कामगार काम करण्यासाठी येण्याजाण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यावर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages