पेनूर येथे महामुद आणि सलमान पाटील फाऊंडेशनतर्फे मुला-मुलींसाठी मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण ; मुलाखत आणि परिक्षेव्दारे होणार निवड
पेनूर : प्रतिनिधी - पेनूर (ता.मोहोळ) येथील महामुद आणि सलमान पाटील फाऊंडेशनतर्फे मोहोळ तालुक्यातील मुला-मुलींसाठी मोफत आर्मी,पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे.यासाठी मुलाखत व परिक्षेद्वारे निवड करण्यात येणार असुन दहावी,बारावीच्या गरिब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे,याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन महामुद आणि सलमान पाटील फाऊंडेशनचे संचालक तथा राष्ट्रीय खेळाडु आमिर पाटील यांनी केले आहे.
प्रशिक्षणासाठी उमेदवार हा दहावी,बारावी पास कींवा परिक्षा दिलेला असावा. उमेदवारांची ३० गुणांसाठी लेखी परिक्षा व २० गुणांसाठी मुलाखत घेतली जाणार आहे.गुणवत्ता यादीनुसार पहिल्या ३० मुलांची व २० मुलींची निवड केली जाईल.
लेखी चाचणीसाठी ३० मिनीटे वेळ असुन बुध्दीमापन २० गुण,गणित ५ गुण,महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ ५ गुण असा अभ्यासक्रम असणार आहे.
सहभागी होण्यासाठी प्रशांत मोतीकर ८५३०३९४२२७,सुरज टिंगरे ९५०३७६८३३५,मुज्जफर मुजावर,७७७४८३०९५०,स्वप्नाली कुलकर्णी ७४९८१६९०१३ या क्रमांकावर २० एप्रिल पर्यंत नाव नोंदणी करावी.परीक्षा व मुलाखतीचा दिनांक व वेळ नोंदणी केलेल्या उमेदवारास भ्रमणध्वनीव्दारे कळविण्यात येईल.
सोनभद्रचे आयपीएस सलमानताज पाटील,सोलापूर ग्रामीणचे निवृत्त पोलीस उपविभागीय अधिकारी आय.एच.आत्तार,पेनूरचे सुपुत्र नाशिकचे पोलीस निरिक्षक संभाजी गायकवाड,सोलापूरचे पोलीस निरिक्षक राजन माने,मुंबईचे पोलीस निरिक्षक समाधान चवरे,मुंबईचे पोलिस निरिक्षक विजयकुमार डोके,मुंबईचे पोलीस उपनिरिक्षक सौ.सुनिता चवरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मोहोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील गरिब व होतकरु मुलां-मुलींसाठी आर्मी,पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मोफत देणार आहे असे,महामुद आणि सलमान पाटील फाऊंडेशनचे संचालक तथा राष्ट्रीय खेळाडु आमिर पाटील यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment