तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी;
जिल्हाधिकारी यांचे आदेश
सोलापूर, दि. 14: कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादींची विक्री करणारी सर्व दुकाने/पानटप-या 30 एप्रिल 2020 रोजी रात्री 12:00 पर्यंत बद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले आहेत.
या आदेशात पुढे म्हटले आहे की, 1) पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, सोलापूर 2) सहाय्यक आयुक्त, अन्न प औषध प्रशासन, सोलापूर, 3) प्रशासन अधिकारी, नगरपालिका प्रशासन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर 4) उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद सोलापूर 5) आयुक्त, सोलापूर महानगरपालिका, सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती व मुख्याधिकारी नगरपरिषद, जिल्हा सोलापूर यांनी त्यांचे-त्यांचे कार्यक्षेत्रात कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा.
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र असून अशा व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांच्याविरुध्द संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी कार्यवाही करावी, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment