कोरोना संबंधीत मोहोळ तालुका प्रशासनाचे कामकाज उत्तम आ. माने
शासकीय अधिकाऱ्यां समवेत कोरोना आढावा बैठक संपन्न
मोहोळ : सध्या कोरोना ने विविध राज्य देशासह संपूर्ण जगात धुमाकूळ घातला असून त्यावर मात करण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना सुरू असून मोहोळ मतदारसंघात सुद्धा आरोग्य विभाग,महसूल विभाग,पोलिस प्रशासन,बांधकाम,महावितरण,कृषी विभाग तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती,नगरपालिका सह इतर संबंधित सर्व घटकांचे सुद्धा कामकाज उत्तम असून तालुक्यातील गावोगावी उत्तम प्रकारचे उपाययोजना केल्या आहेत व सुरू आहेत.असे कौतुकास्पद वक्तव्ये मोहोळ चे आमदार यशवंत माने यांनी केले आहे.
मोहोळ (जि.सोलापूर) येथे मोहोळ पंचायत समिती सभागृहात सोमवार(दि१३)रोजी मोहोळ तालुक्यात कोरोना संदर्भात प्रशासनाने केलेल्या कामकाजाचा आढावा बैठकी आ यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.त्या आढावा बैठकीत कोरोना संदर्भात प्रशासनाने केलेल्या उत्तम प्रकारे कामाचा अहवाल पाहून कोरोना संबंधीत काम करणाऱ्या प्रशासनातील सर्व विभागाचे कौतुक करून आभार मानले.
यावेळी सोलापूर उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड,तहसीलदार जीवन बनसोडे,गटविकास अधिकारी अजिंक्य येळे,पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अरुण पातरुड्कर,ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.गायकवाड,सहाय्यक निबंधक जिजाबा गावडे,पंचायत समिती चे सभापती रत्नमाला पोतदार,तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे,नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन.के.पाटील,बालविकास प्रकल्पअधिकारी किरण सुर्यवंशी,कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव सचिन पाटीलसह अन्य अधिकारी उपस्थित होते.
कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी उपाययोजना करत असून प्रशासनाल सर्वानी सहकार्य करून वेळोवेळी केलेल्या सुचनेचे पालन करावे.व विनाकारण घरातून बाहेर पडू नये असे आवाहन आ.यशवंत माने यांनी मोहोळ तालुक्यातील व मतदारसंघातील नागरिकांना केले आहे.


No comments:
Post a Comment