जत्रा, सामाजिक कार्यक्रमांवर 30 एप्रिलपर्यंत बंदी; जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांचे गर्दी टाळण्याचे आवाहन. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 14, 2020

जत्रा, सामाजिक कार्यक्रमांवर 30 एप्रिलपर्यंत बंदी; जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांचे गर्दी टाळण्याचे आवाहन.

जत्रासामाजिक कार्यक्रमांवर तीस एप्रिलपर्यंत बंदी
जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांचे गर्दी टाळण्याचे आवाहन

      सोलापूरदि.14: कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये,  यासाठी  जिल्ह्यातील सभामेळावेसामाजिक कार्यक्रम,  जत्रायात्राऊरुसधार्मिक  सास्कृतिक  कार्यक्रमक्रीडा स्पर्धा तसेच गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर आजपासून ते 30 एप्रिल  2020 रोजी रात्री 12:00 पर्यंत बंदी  घालण्यात आली आहेजिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आपत्ती  व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 34 आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये हे आदेश आज जारी केले आहेत.
            या आदेशात नमूद करण्यात आले आहे की,  जिल्ह्यातील यात्राजत्राधार्मिक  सामाजिक कार्यक्रमात  पुजारी किंवा धर्मगुरु यांना विधीवत पुजा करण्यास किंवा पंरपरेने करावयाचे कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थित करण्यास बंदी असणार नाही.  खासगी कार्यक्रम फक्त कौटुंबिक स्वरुपात करण्यास बंदी असणार नाहीपरंतु या दोन्ही बाबतीत वैद्यकीय सुरक्षा पाळणे बंधनकारक राहीलयासाठी संबंधित तालुक्याचे तहसिलदार किंवा मुख्याधिकारीनगरपालिका किंवा आयुक्तसोलापूर महानगरपालिका यांची त्यांचे कार्यक्षेत्रातील अशा कार्यक्रमासाठी लेखी पुर्वपरवानगी घ्यावी लागेल.
            या आदेशात पुढे म्हटले आहे कीसर्व तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी  मुख्याधिकारी नगरपालिका/परिषद  आयुक्तसोलापूर महानगरपालिका यांना त्यांचे-त्यांचे कार्यक्षेत्रात होणा-या अशा कार्यक्रमांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच फक्त विधिवत पुजा किंवा कौटुंबिक कार्यक्रमांना परवानगी देण्यासाठी प्राधिकृत करुन तसे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.
            तहसिलदार किंवा मुख्याधिकारी किंवा आयुक्त यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन अशा गर्दीचे कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधित संयोजकाविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये कारवाई करण्यात येईल.  यासाठी संबंधित सर्व तहसिलदारमुख्याधिकारी  आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आहेअसेही या आदेशात नमूद  करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages