वाईन शॉप, बिअर शॉपी 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 14, 2020

वाईन शॉप, बिअर शॉपी 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

वाईन शॉप, बिअर शॉपी 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार : 
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर 




सोलापूरदि.14 :- कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव लक्षात घेता अधिक खबरदारी म्हणून जिल्ह्यातील  वाईन शॉप (एफएल-2)   बिअर शॉपी, (एफएलबीआर-2)  परवाना कक्ष (,एफएल-3) बिअर बार (फॉर्म-ई), कायमस्वरुपी क्लब  (ई-2), तात्पुरती क्लब (एफएल-4)  आणि देशी दारु किरकोळ विक्रीस  (सीएल -3)  30 एप्रिल 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे  आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम -2005 मधील अधिकाराचा वापर करुन हे आदेश जारी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेशात  म्हटले आहेआदेशाचे उल्लंघन करणा-यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम -2005 मधील तरतूदीनुसार संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईलअसेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages