Hot Posts

6/recent/ticker-posts

शुभम मोरे मित्रपरिवाराच्या वतीने मोहोळ पोलीसांसाठी सॅनिटायझर वाटप

शुभम मोरे कुटुंबिय व मित्रपरिवाराच्या वतीने लॉकडाऊन काळात अहोरात्र झटणाऱ्या मोहोळ पोलीसांसाठी सॅनिटायझर, नाष्टा अनमोल मदत 
        

           कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं संपूर्ण देश लॉकडाऊन असताना स्वत:ची तसेच स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता आपलं कर्तव्य अहोरात्र चोवीस तास पार पडणाऱ्या पोलीस बांधवांना व या लॉकडाऊनमुळे ज्यांची उपासमार होतेय अश्या गोरगरिबांना शुभम (भाईजी) मोरे कुटुंबिय व मित्र परिवाराच्यावतीने सॅनिटायझर, नाष्टा, पाणी बॉटल, बिस्कीट, चहा देण्यात आले.
              यावेळी मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कोकणे, पोलीस नाईक निलेश देशमुख, बंडु मोरे, जाधव, घाटे व इतर सर्व पोलीस अधिकारीही उपस्थित होते.
या कार्यासाठी औदुंबर देशमुख, सौरभ मोरे, नरेंद्र गरड, सुरज भोसले, ओम मोरे, गणेश वसेकर, निरंजन केवळे व इतर सर्वांनी अनमोल मेहनत घेतली.
Reactions

Post a Comment

0 Comments