सांगोला - "त्या" दोघांना होम कॉरंनटाईन मध्ये ठेवण्याचे आदेश...
सांगोला (जगन्नाथ साठे) - दिनांक २८ मार्च रोजी सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या वाणी चिंचाळे, आणि हंगिरगे येथील दोघा संशयितांना सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे उपचारासाठी दाखल केले, पण कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून न आल्याने त्यांना १४ दिवस होम कॉरंनटाईन मध्ये ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.
सध्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर पुणे -मुंबई तसेच परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. यावेळी हंगीरगे व वाणीचिंचाळे येथील दोन रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याची अफवा संपूर्ण तालुका भर पसरली होती.
व सर्वत्र भितीचे वातावरण पसरले होते. सध्या संचार बंदी असून कोणीही संचार बंदीचे उल्लंघन करणार नाही, घरातच थांबून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
पुणे ,मुंबई अथवा परराज्यातून आलेल्या नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या आरोग्यासाठी संबंधित गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा. स्वतः स्वतः ची काळजी घ्यावी, घरातून बाहेर पडू नये, सोशल डिस्टनसिंग ठेवून व्यवहार करावा,आणि प्रशासनास सहकार्य करावे.अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
0 Comments