Hot Posts

6/recent/ticker-posts

आ. देशमुख यांनी साधला सरपंच, भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद;नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्याचे केले आवाहन

आ. देशमुख यांनी साधला सरपंच,  भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद नागरिकांमध्ये कोरोनाबाबत  जनजागृती करण्याचे केले आवाहन 

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व पक्षाचे सरपंच आणि भाजप पदाधिकाऱ्यांना दूरध्वनीवर संपर्क करून त्या त्या भागातील आढावा घेत समस्यांची माहिती घेतली. यावेळी आमदार देशमुख यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचे सर्वांनी पालन करावे,  असे आवाहन केले.
सध्या सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे  सावट पसरलेले आहे. सर्व जिल्हावासीय भयभीत झालेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार  देशमुख यांनी रविवारी सरपंच आणि भाजप पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संवाद साधून जनतेला धीर देण्याचे आवाहन केले. याशिवाय  त्या त्या तालुक्यातील परिस्थिती कशी आहे,  याचा आढावा घेतला तसेच या समस्या असतील त्यावर उपाययोजना करण्यास सांगितले. या काळात कोणीही औषधाविना आणि अन्नधान्या विना राहू नये याची प्रामुख्याने काळजी घ्यावी असेही यावेळी देशमुख यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन करावे कोणीही घराबाहेर पडू नये अत्यावश्यक काम असले तरच घराच्या बाहेर पडावे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन केले. कशाचीही गरज लागली तर आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहनही आमदार देशमुख यांनी केले.
Reactions

Post a Comment

0 Comments