संग्रामनगर ग्रामपंचायतीने दिला सतर्क राहण्याचा इशारा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 20, 2020

संग्रामनगर ग्रामपंचायतीने दिला सतर्क राहण्याचा इशारा

संग्रामनगर ग्रामपंचायतीने दिला सतर्क राहण्याचा इशारा

अकलूज (प्रतिनिधी) महाभयानक अशा कोरोना विषाणूने जगभरात तांडव घातला असून या पार्श्वभूमीवर संग्रामनगर गावच्या नागरिकांनी घाबरून न जाता प्राणघातक अशा आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी असे आवाहन संग्रामनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच राजवर्धनी माने- पाटील यांनी केले आहे.सध्या स्थितीत महाराष्ट्रातील पुणे या शहरात काही रुग्णांना या आजाराची लागण झालेली दिसून येत आहे. याकरिता संग्रामनगर अकलूज व परिसरातील नागरिकांचे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने संग्रामनगर अकलूज ग्रामपंचायतीचे वतीने कोरोना विषाणू आजाराची लक्षणे व सदर रोगावर करावयाची उपाययोजना याबाबतचे माहितीपत्रक संपूर्ण संग्रामनगर अकलूज गावात होम टू होम वाटप करण्यात आले आहे. तसेच शहरातील प्रत्येक मुख्य चौकाच्या ठिकाणी डिजिटल बोर्ड लावून कोरोना आजारा बाबत व त्याच्या अनुषंगाने हातांची स्वच्छता राखणे बाबत व नागरिकांनी करावयाची उपाययोजना याबाबत आव्हान करण्यात आले आहे. तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सँनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. तेव्हा सध्यास्थितीत   संग्रामनगर अकलूज व परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता या रोगाचा प्रसार होऊ नये याकरिता वेळीच उपाययोजना  करण्यात यावी. व लगेच वैद्यकीय सल्ला घ्यावा. कोरोना या विषाणू आजाराचा प्रादुर्भाव संग्रामनगर अकलूज व परिसरात होऊ नये याकरता आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे असे आव्हान या वेळेस सरपंच राजवर्धनी श्रीराज माने पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages