कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने मरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात मास्क वाटप
मरवडे (प्रतिनिधी) पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आज मरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात राज्याचे सचिव डॉ आशिषकुमार सुना जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी केंगार यांच्या हस्ते कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क वाटप करण्यात आले यावेळी मरवडे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकार डॉ मलाप्पा माळी,आरोग्य सहाय्यक पांडुरंग कोळी,चंद्रकांत पवार,राणी स्वामी, मोहन सरडे,लाडलेसो मुलाणी, परशु केंगार, आरोग्य सेवक,सेविका मदतनीस,अंगणवाडी सेविका यांच्यासह आदीजन उपस्थित होते,कोरोना या भयानक आजारावर सर्वानी काळजीपूर्वक प्रतिबंधात्म उपाय म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतः मास्क वापरून जनतेला घ्यावयाच्या काळजी संदर्भात सूचना केल्या पाहिजेत, अंगणवाडी सेविका म्हणून आपण लहान बालकांना शिकविता, मुलांच्या बरोबर त्याच्या पालकांनाही कोरोना वर घेण्यात येणाऱ्या उपाय योजनेची माहीती देण्याचे सांगितलेआरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी बॅंकेचे कर्मचारी ,सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्या लोकांनी मास्कचा वापर करावा असे मत डॉ सुना यांनी बोलताना सांगितले

No comments:
Post a Comment